बालपण व प्राथमिक शिक्षण करुळ येथे . एम. एस. हायस्कूल कणकवली १९६४ साली एस.एस.सी उत्तीर्ण, १९६५ ते १९७५ पर्यंत सरकारी नोकरी. सरकारी नोकरी करत असताना डॉ. दातार महाविद्यालय चिपळूण मधून १९७४ साली बी. कॉम. उत्तीर्ण.
१९७३ साली सदगुरु स्वामी स्वरूपानंद, पावस (रत्नागिरी) यांचेकडून नाथ संप्रदायाची दीक्षा.
१९७५ सरकारी नोकरीचा राजीनामा व श्री क्षेत्र आळंदी देवाची येथेच वास्तव्य.
श्री क्षेत्र आळंदी देवाची येथेच स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांचेकडून २९ ऑगस्ट १९७५ (श्रीकृष्ण जन्माष्टमी) रोजी श्री हरिहरेंद्र स्वामी मठ, आळंदी देवाची येथे विधिवत संन्यास ग्रहण.
१९७५ श्रावण वद्य द्वादशी रोजी प. प. स्वामी गोकुलेंद्र सरस्वती यांच्या हस्ते स्वामी स्वरूपानंद यांच्या प्रथम पुण्यदिनी समाधी शिलान्यास व समाधीस पुष्पहार वाहिला.
श्री क्षेत्र पावस येथे असताना सदगुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या स्वप्नदृष्टांताप्रमाणे संन्यास वस्त्रे उतरवून नोकरी करण्याची आज्ञा. त्याप्रमाणे गोवा (वास्को-द-गामा) येथे सन १९७९ ते १९९२ पर्यंत बांदेकर ग्रुप ऑफ कंपनीमध्ये नोकरी.
१९९२ मध्ये नोकरीचा राजीनामा व स्वामी स्वरूपानंद यांच्या आज्ञेप्रमाणे, करवीर निवासीनी जगन्माता व भगवान नृसिंह सरस्वती यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पारमार्थिक साधना व अभ्यास.
भगवान दत्तात्रेय यांच्या मार्गदर्शनाखाली सोऽहं साधना व ग्रंथलेखन.
श्री ज्ञानेश्वरी मूळ ग्रंथाचे हस्तलिखित करून सटीप पोथी तयार केली. (१९९९)
श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे हस्तलिखित करून हस्तलिखित पोथी तयार केली. (२००४)
भक्ती-भावे-नमितो हे गुरुचरित्रावरील साकी वृत्तातिल संक्षिप्त सार स्तोत्र. (२००६)
श्रीकृष्ण लहरी :- प. प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी यांच्या मूळ संस्कृत ग्रंथाचा साकी वृत्तात मराठी अनुवाद. (जाने. २००७)
श्री संत स्वामी स्वरूपानंद पावस (रत्नागिरी) यांचे पद्ममय साकी वृत्तातिल चरित्र व सोऽहं साधना हा ग्रंथ (२००७)
श्रीमद्भगवदगीता अभंगात्मक प्राकृत अनुभव श्रीमत् अभंग-गीता (२००९)
सन २००७ मध्ये स्वामी स्वरूपानंद पावस (रत्नागिरी) यांच्याकडून सोऽहं अनुग्रह देण्याचा म्हणजे संप्रदाय चालविण्याचा स्वप्नदृष्टांत देऊन अधिकार दिला.
दि. १-९-२०१० रोजी स्वामी स्वरूपानंद, भगवान नृसिंह सरस्वती, जगन्माता करवीर निवासीनी महालक्ष्मी यांच्या आज्ञेप्रमाणे उत्तरलेलें संन्यास वस्त्र पुन्हा ग्रहण केले.
दि. २८-४-२०११ रोजी भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून दंड ग्रहण.